ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस पळवून नेलेल्या आरोपीस अत्यंत शिताफीने अमरावती येथून ताब्यात घेऊन अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 16 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे. हिंगणघाट येथे अप क्र. 305/2025 कलम 137(2), 143(4) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पीडित मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक करून पथक तयार करण्यात आले.

सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पीडित मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करून यातील आरोपी नामे ऐफाज उर्फ पापा अन्सार खा पठाण वय 19 वर्षे रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट हा अमरावती येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून नमूद आरोपीस इक्बाल कॉलनी अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहत असल्याचे सांगितले त्यावरून यातील पीडित अल्पवयीन मुलीस सुद्धा इकबाल कॉलनी जि. अमरावती ताब्यात घेण्यात आले. आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो. स्टे. हिंगणघाट करीत आहे यातील अल्पवयीन मुलगी रीतसर कायद्याप्रमाणे पो. स्टे. हिंगणघाट यांच्याकडे देण्यात आले आहे.

  सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेंन्द्र ठाकुर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, पोहवा संजय राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच सायबर सेल येथील अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अनुप कावळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये