शासकीय सेवेत निवड झालेल्या त्या बहीण भावाचा सामाजिक संघटनानी केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, ज्येष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजाच्या वतीने शिराळा येथील श्री.नागोराव साहेबराव दुनगहु पाटील यांची कन्या प्रियंका नागोराव दुनगहु हिची जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल व सिध्देश्वर नागोराव दुनगहु याची महाराष्ट्र पोलीस विभाग बुलडाणा येथे निवड झाल्याबद्दल दोघांचा शाल व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री.बळीराम मापारी मामा अध्यक्ष, देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगावराजा,के.पी.खांडेभराड अध्यक्ष सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,व्यंकटराव जमदाडे, पंडितराव पाथरकर, रमेश नरोडे ,उपाध्यक्ष जनसेवा सामाजिक समिती,गोविंद बोरकर, सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा उपस्थित होते, निवड झालेल्या बंधु भगिनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



