देऊळगाव राजा येथे मतदान अधिकारी व इतर अधिकारी यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने निर्धारित कार्यक्रमानुसार प्रथम चरणातील मतदान अधिकारी व इतर अधिकारी प्रशिक्षण दिनांक :-१६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमास श्री सुरेश थोरात, निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सौ. वैशाली डोगरजाळ, तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास उपस्थित मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या सर्व नियमावली व प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या.
तसेच सर्व मतदान कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक तांत्रिक व कार्यकारी माहिती समाविष्ट असलेले प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील कार्यपद्धती
मतदारांची ओळख पटविण्याची प्रक्रिया (ओळखपत्र, पर्यायी दाखले) मतदानाची दिनचर्या – Mock Poll, Poll Start, Poll Close मतदार सहाय्य सुविधा (PwD, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला)गोपनीयता व आचारसंहिता पालन दिवसअखेर अहवाल (Presiding Officer Diary) भरण्याची पद्धत केंद्र सुरक्षा, साहित्य संरक्षण व तात्काळ नोंदवही संग्रहन प्रक्रिया अत्यावश्यक संपर्क क्रमांक व नियंत्रण कक्ष माहिती आपत्कालीन परिस्थिती हाताळणी आणि तात्काळ कळविण्याची प्रक्रिया ईव्हीएम मधील Ballot Unit, Control Unit यंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यंत्रांची जोडणी, चाचणी, कार्यपद्धती व सत्यापनमतदान केंद्रावरील कार्यप्रवाह, मतदार ओळख प्रक्रिया व नोंदवही लेखन मतदानादरम्यान उद्भवू शकणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निदान व निराकरण मतदान समाप्तीनंतर Control Unit चा Sealing Protocol अन्य अनुषंगिक दस्तऐवजांचे अचूक व वेळेवर लेखन याची माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणादरम्यान नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएमची प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविण्यात आली. मतदानाच्या दिवशी प्रक्रिया निर्विघ्न, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व समन्वयपूर्वक पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी मान्यवर अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले.



