ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोली येथे माणिकगड सिमेंट वर्क्सने उत्साहात साजरा केला बालक दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सी एस आर टीमने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानोली येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शाळेतील 70 विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जी व्हि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यानंतर शिक्षक श्री. राजाराम घोडके यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. तसेच रायपूरे मॅडम यांचेही कार्यक्रमात सक्रिय सहकार्य लाभले.

यानंतर विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली गेली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी चाचा नेहरू यांच्या जीवनाशी संबंधित 10 प्रश्नांची प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक दुर्योधन वडगुळे आणि ललिता आडे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक समर्थ आणि यशस्वी झाला.

सी एस आर टीमने सांगितले की, अशा उपक्रमांचा उद्देश फक्त मुलांचे मनोरंजन करणे नसून, विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणे, शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि गावाच्या सामाजिक विकासात हातभार लावणे हा देखील आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सी एस आर टीमचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये