हिरापूर ता.कोरपना येथे बिरसा मुंडा 150 जयंती(जनजाती गौरव दिन/वर्ष)मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. देशातील स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीचे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देशातील विविध आदिवासी समाजाच्या विकासाच्या योजनाचा शुभारंभ करण्यात येत आहे. जयंती कार्यक्रमा प्रसंगी यावेळी भाजपा जमाती मोर्चा चे महामंत्री/कोषाध्यक्ष भाजपा कोरपना आदिवासी युवा नेते प्रमोद कोडापे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे,कोरपना कृ. उ.बाजार समितीच्या माजी संचालिका साधना वाभीटकर,ग्रा. पं. सदस्य दुर्योधन सिडाम, माजी सरपंच मोहन तुमराम, माजी ग्रा. पं सदस्य रविंद्र आत्राम, अर्जुन पंधरे,अनिल कुमरे, गजानन सिडाम,विशाल कोडापे महेंद्र कोडापे,बाला कोडापे, सुरेश तुमराम, मारोती मडचापे, मारोती सिडाम अजय मडावी,लिलाबाई आत्राम, शांताबाई पिटलेवार किरण तुमराम, भ्याग्यश्री पंधरे, सुवर्णा सिडाम,कालिंदाबाई कुमर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



