ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नौकारी येथे खाण सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

जनजातीय गौरव पंधरवाड्यात खाण सुरक्षिततेचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जनजातीय गौरव दिवस 2025 आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मरणार्थ आयोजित जनजातीय गौरव वर्ष पंधरवाड्यात (1 ते 15 नोव्हेंबर) नौकारी गावात 13 नोव्हेंबर रोजी खाण सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश गावकऱ्यांना खाण कशी कार्य करते आणि खाणकामाच्या वेळी सुरक्षितता कशी राखावी याबाबत माहिती देणे होता. कार्यक्रमात गावकऱ्यांसाठी छोटेखानी प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली.

नौकारी हे कोरपना तालुक्यातील आदिवासी गाव असून ते नौकारी चुनखडी खाणीच्या शेजारी वसलेले आहे. या कार्यक्रमाला सरपंच श्रीमती संगीता मडावी, उपसरपंच श्री शत्रुघ्न शेडमाके, खाण व्यवस्थापक श्री बलराम सिंह, सी एस आर प्रमुख श्री प्रतीक वानखेडे तसेच खाण विभागातील श्री प्रकाश त्रिपाठी आणि श्री घनश्याम हजारे उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमाला 80 गावकरी सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये