ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे विज्ञान मेळावा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती व बालक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने इयत्ता सहा ते बाराच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनी तथा विज्ञान मेळावा व विज्ञान रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री विकास भोजेकर, सचिव श्री धनंजय गोरे संचालक श्री रामचंद्र सोनपितरे, होते तर प्रमुख अतिथी म्हणून कोरपणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री कल्याणजी जोगदंड, मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम, उपमुख्याध्यापक श्री विजय डाहूले, पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्की तथा सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. 90 च्या वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत 45 मोडेल सादर केले तसेच विज्ञान रांगोळी स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये