मेहुणा राजा येथील अवैध देशी दारूचेचे दुकाने बंद करा
तंटामुक्ती समितीचे ठाणेदारास निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मेहुणा राजा येथे अवैधरित्या सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी ठाणेदार, देऊळगाव राजा यांना तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रल्हाद काकडे, देवेंद्र काकडे,पप्पू काकडे तसेच गावातील पुरुष व महिला यांनी निवेदन दिले असून दारूचे दुकान बंद न केल्यास निवेदन दिल्या पासून दहा दिवसांनी उपोषण करू असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.
देऊळगाव मही आउट पोलीस स्टेशन हद्दीतील मेहुणा राजा येथे ग्रामपंचायत कार्यालया मागे असलेल्या मेहुणा राजा ते सिनगाव रोड लगत अवैध रित्या देशी दारूचे दुकाना समोर रांगा असल्याने गावात दुष्परिणाम दिसून येत आहे . शंभर मीटरच्या आत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे तितक्याच अंतरावर हनुमान जी चे मंदीर आहे अंगणवाडी बालवाडी नियंत्रण कक्षेत येत आहे
हप्त्याशी बांधील असलेल्या आउट पोलीस स्टेशन देऊळगाव मही तात्पुरती कारवाई करतात कधी कधी तर दारू विकणारे स्वतः केस देतात सोबत हप्ता सुद्धा देतात त्यामुळे की काय ग्रामस्थांनी वाऱ्या कडे चेहरा केला आहे अवैध दारू विकणारे फक्त दोन असतात मात्र दोन हजार गावकरी त्या दोघा समोर नांग्या टाकतात खरे तर गावानीच दारू विकू द्यायला नाही पाहिजे मात्र एकोपा नसल्याने हिम्मत वाढलेल्या दृष्ट प्रवृत्तीच्या माणसांनी उच्छाद मांडला आहे लहान मुले सुद्धा व्यसनाकडे वळाल्याने तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रल्हाद काकडे व इतरांनी ठाणेदार देऊळगाव राजा यांना निवेदन दिले असून पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे



