आजचे सर्व बालक उद्याचा भारत घडवण्याची क्षमतेचे _ प्रमोद घोंगे पाटील

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय जैन संघटना शाखा देऊळगाव राजा व ऑक्सफर्ड इंटर नॅशनल ड्रीम स्कूल यांचे संयुक्तं विद्यमाने दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्ताने चिल्लर पार्टी हा कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आला या प्रसंगी उपस्थित बच्चे कंपनीला मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक प्रमुख प्रमोद घोंगे पाटील यांनी सांगितले की आजचा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा भारत घडवण्याची क्षमतेचा असून सर्वांनी हे ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास व विद्यार्थी याने निवडलेल्या त्या क्षेत्रात नक्कीच यश मिळवेल कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन, चाप्टर अध्यक्ष पियूष खडकपूरकर,संचालक अंकित वाटाणे ,मनीष कोठेकर,सतेज डोणगावकर, पींकेश कोचाट उपस्थित होते.
याबाबत सविस्तर असे की संपूर्ण भारत वर्षात भारतीय जैन संघटनेच्या वतीने जानेवारी 25 ते नोव्हेंबर 25 या 11 महिन्यात विविध फाउंडेशन प्रोग्राम घेण्याचे सूचित केले होते यासाठी BJS चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा,राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला, राज्याध्यक्ष केतन भाई शहा, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन,नॅशनल हेड फाउंडेशन प्रोग्राम राजेश जैन खिंवसरा, नॅशनल जनरल सेक्रेटरी डॉक्टर पंकज चोपडा, नॅशनल सेक्रेटरी दीपक चोपडा या टीमने नियोजनबद्ध अभ्यासपूर्वक ज्या ज्या ठिकाणी बीजेएस चे चॅप्टर आहेत त्या त्या चाप्टरने फाउंडेशन प्रोग्राम घेण्याचे सूचना झाले वरून देऊळगाव राजा बी जे एस चाप्टर ने जानेवारी 25 ते नोव्हेंबर 25 या कालावधीत दरमहा नेमून दिलेले फाउंडेशन प्रोग्राम आयोजित केले दिनांक 14 नोव्हेंबर 25 रोजी लहान बालकांसाठी *चिल्लर पार्टी* या नावाने फाउंडेशन प्रोग्राम शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये बीजेएसच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले यावेळी उपस्थित ताना मार्गदर्शन करताना प्रमोद भोंगे पाटील यांनी सांगितले की चाचा नेहरू यांची आज जयंती असून चाचा नेहरू यांना लहान मुले जास्त प्रिय होती त्यांना माहीत होते की,
बालपणापासूनच योग्य संस्कार शाळेतील शिक्षक यांनी दिल्यास ते उद्याचा उज्वल भारत घडूऊ शकतात बालकांच्या बुद्धीच्या जलगतीने विकास होण्यासाठी त्यांना वेळोवेळी अपेक्षित असे व्यास पीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ते शिक्षा घेत असलेल्या शिक्षण संस्थेची असते आजचा प्रत्येक बालक हा उद्याचा यशस्वी भारत करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो कार्यक्रम यशसवी साठी प्रिया घोंगे पाटिल अध्यक्ष, उप मुख्याध्यापिका स्वाती भालेराव, पर्यवेक्षक लक्ष्मण खांडे भराड,शिक्षिका वैशाली चेके,प्रिया जाधव शिक्षक आकाश सद्गुले यांनी अथक परिश्रम घेतले.



