ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन दिवसात ४ वाघ जेरबंद 

सावली वनपरिक्षेत्रातील कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सावली वनपरिक्षेत्रातील मौजा डोनाडा व गवारला येथील जंगलात मागील २  महिन्यापासून 4 वाघांचा धुमाकुळ होता.

सध्या तालुक्यात धान कापणीचे हंगाम सुरु असून सदरचे वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान २ वाघ (बछडे) व दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान २ वाघ (बछडा व आई) असे एकूण ४ वाघ जेरबंद करण्यात आले.

सदरची कारवाई श्री राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, श्री विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, श्री दत्ता जाधव परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

सदर मोहिमेकरीता श्री घनश्याम नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, डॉ. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी, TTC चंद्रपूर, श्री अक्षय नारनवरे जीवशास्त्रज्ञ चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, श्री अनंत राखुंडे क्षेत्र सहाय्यक, व्याहाड, श्री पाटील, श्री मेश्राम, श्री सिडाम, वनरक्षक श्री मुंडे, श्री सोनकर, श्री खुडे, श्री डांगे, श्री आखाडे श्री बोनलवार, श्री अहिरकर श्री इंगळे, श्री कराड, श्री मुरकुटे, श्री नागोसे व श्री बोरकर तसेच PRT चमू डोनाडा, गवारला, हरंबा, उपरी, बीट मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये