ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नर्सरी कडे जात असलेल्या शेतकऱ्याच्या लोडिंग रिक्षाला कारची धडक 

एक गंभीर ,एक किरकोळ जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   देऊळगाव राजा चिखली रोडवरील कुंभारी येथे झालेल्या अपघातात लोडिंग ॲपे चालक गंभीर तसेच एक जखमी झाल्याची घटना आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी घडली.

प्राथमिक माहितीनुसार अनिस अब्दुल पठाण राहणार दहिगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना हा त्याच्या ताब्यातील तीन चाकी लोडिंग ॲपे एमएच ४९ डी३८४२ मध्ये निमगाव येथील शेतकरी नामदेव कोरडे यांचे शेतातील रोपे कुंभारी नर्सरी येथे घेऊन जात होता दुभाजक क्रॉस करून जात असताना भरधाव येणाऱ्या कार क्रमांक एम एच 28 ए झेड 7500 ने जबर धडक दिली, यामध्ये ऍपे चालक गंभीर जखमी झाला तर लोडिंग ॲपे मधील शेतकरी नामदेव कोरडे हे जखमी झाले आहेत वृत्त लिही पावेतो पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद नव्हती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये