Health & Educationsग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार सहाय्यता कक्षाची स्थापना

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (जि. चंद्रपूर)— नगर परिषद घुग्घुस साधारण निवडणूक 2025 अंतर्गत उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रियेत सोय व्हावी या उद्देशाने नगर परिषद घुग्घुस येथे उमेदवार सहाय्यता कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, चंद्रपूर यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, या सहाय्यता कक्षाची जबाबदारी श्री. निलेश रंजनकर, मुख्याधिकारी, न.प. घुग्घुस (मो. 8237983780) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनाशी संबंधित कामकाजात मदत करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या व्यवस्थेचा उद्देश उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरताना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना तसेच इतर प्रक्रियात्मक मार्गदर्शन मिळावे हा आहे, जेणेकरून कोणताही उमेदवार तांत्रिक कारणांमुळे वंचित राहणार नाही.

प्रसिध्दी पत्रकात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी नामनिर्देशन प्रक्रियेच्या दरम्यान या सहाय्यता कक्षाचा लाभ घेऊन कोणत्याही अडचणीशिवाय आपले अर्ज सादर करावेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये