ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणूक निरीक्षक सुधीर खांदे यांनी देऊळगाव राजा येथे भेट देऊन घेतला आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर श्री. सुधीर खांदे, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक, बुलढाणा यांनी आज देऊळगाव राजा येथे भेट देऊन निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

निरीक्षणादरम्यान खांदे यांनी नामनिर्देशन व्यवस्था/छाननी कक्ष, साहित्य वाटप केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच प्रशिक्षण हॉल यांची प्रत्यक्ष पाहणी केली. निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमानुसार पार पडाव्यात यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

त्यांनी निवडणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या मतपेट्या, सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि प्रशिक्षण कार्य यांचा आढावा घेतला. तसेच स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षा मानकांनुसार व्यवस्था ठेवण्याबाबत त्यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले.

श्री. खांदे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीदरम्यान निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक कार्यवाहीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावताना सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणीदरम्यान श्री सुरेश थोरात निवडणूक निर्णय अधिकारी, वैशाली डोंगरजाळ,तहसीलदार देऊळगाव राजा, सुप्रिया चव्हाण मुख्याधिकारी नगरपरिषद देऊळगाव राजा, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये