ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार, मुर्सा येथे कापूस खरेदीला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या उपबाजार आवार, मुर्सा येथे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी (सोमवार) कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी एकूण ६९१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.

या शुभारंभ कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे, संचालक अनिल चौधरी, विनोद घुगुल, सचिव नागेश पुनवटकर, तसेच मे. गौरीनाथ ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. मुर्सा चे संचालक अशोक हरियाणी, भारती हरियाणी, सागर हरियाणी, आणि कायनात हरियाणी उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकरी प्रविण नांदे ,तुकाराम पाल मुर्सा, सुरेश मुंडे (चंद्रपूर), लक्ष्मण उपासे (मुर्सा), संजय शेळकी (घोनाड), आणि सदानंद हजारे (मोरवा) यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या आयोजनासाठी बाजार समितीचे निरीक्षक संजय शेंडे, प्रवीण राहुलगडे, मापारी गणेश नागोसे, आणि पारखी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे, उपसभापती सौ. अश्लेषा भोयर (जीवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले की —

“चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी आपला शेतमाल उपबाजार मुर्सा येथील मे. गौरीनाथ ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. येथे विक्रीसाठी आणावा असे संयुक्त आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे ) सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये