ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निर्मला कंकाळ यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील दिनदयाल विद्यालयातील शिक्षक विक्रम राजेंद्र कंकाळ यांच्या मातोश्री सौ निर्मला कंकाळ यांचे दिनांक १० नोव्हेंबर २५ रोजी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले मृत्युपश्चात त्यांची दोन्ही मुले जे शिक्षक आहेत विक्रम व विशाल यांनी आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायट्स परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा यांचे सोबत संपर्क साधून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली वरून डॉक्टर काबरा यांनी जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमुस माहिती दिली व गणपती नेत्रालयाचे डॉक्टर निधी लाटकर व त्यांच्या टीमने निर्मलाबाई यांचे मरणोत्तर मतदान करून घेतले त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



