ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये संत प्रवर विज्ञानदेव महाराज यांच्या ४७व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (जि. चंद्रपूर): संत प्रवर सद्गुरु पद उत्तराधिकारी विज्ञानदेव महाराज यांच्या ४७व्या जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने संपूर्ण भारतासह जगातील अनेक देशांमधील हजारो आश्रमांमध्ये हा दिवस भव्य आयोजनाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून विहंगम योग संत समाज, तालुका व जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आणि विहंगम योग आश्रम, नागपूर यांच्या अधिपत्याखाली रविवार, दि. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी डब्ल्यू.सी.एल. सभागृह (टेंपो क्लब) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आयोजनात जी.एम. मनीष पोडे, एस.एम. दीपक टिपले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सहभाग होता. विहंगम योग संत समाज, घुग्घुस-चंद्रपूरचे प्रचारक किशोर (मामा) मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संचालन करण्यात आले.

चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या टीमच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील २२ युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. प्रमुख रक्तदात्यांमध्ये प्रतीक पायगण, सुमित रिंगणे, मनोज नागले, आशुतोष शर्मा, अचिकेत धोटे, आर्यन देवुळकर, बरदास उमके, सुकेसनी उमके, अनिकेत बांसोड, जतिन कुमार, चेतन बुटले, नितीन पापडे, राहुल रासेकर, रतन हुमणे, सौरभ दाणे, अभिषेक कुमार, अविनाश पांडा, लिंगराज साहू, अनुराग मिश्रा, जितेंद्र सिंह, प्रफुल बल्कि आणि आशीष मानकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सर्व रक्तदाते, सहकारी आणि विहंगम योग संत समाजाचे पदाधिकारी यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. या प्रसंगी भक्त व शिष्यवर्गाने गुरु विज्ञानदेव महाराजांचा जन्मोत्सव समाजसेवेच्या रूपात साजरा करत “मानवता हाच सर्वोच्च धर्म” हा संदेश दिला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये