छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे संस्कार दिनानिमित्त सुसंस्काराचे धडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचा जन्मदिन अर्थात संस्कार दिनाचे औचित्य साधून शेकडो विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देण्यात आले.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार सुसंस्कार शिबिराचे माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून आत्तापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सुसंस्कारित करणारे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या जन्मदिन अर्थात संस्कार दिनाची सुरुवात सर्वप्रथम वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजय विधाते होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रधर्म युवा मंचाचे केंद्रीय सदस्या कविताताई येनुरकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून भावी पिढी घडविण्याकरिता सुसंस्काराची गरज यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्रीगुरुदेव कार्यकर्ता विशाल गावंडे यांनी संस्कार दिनाचे महत्त्व पटवून सांगितले व ग्रामगीताचार्य सोनाली अमोल गावंडे यांनी महिला सक्षमीकरण काळाची गरज यावर विचार मांडले. कार्यक्रम प्रसंगी सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थिनी आर्या गुणवंत कुत्तरमारे यांनी आओ सुंदर देश बनाये.. हे भजन सादर केले.
याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विनोद रासेकर, साधूजी मत्ते, ईश्वरजी मत्ते, उर्मिला निखाडे, श्वेता उईके, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष पेंदोर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता प्राचार्य सरिता कुंभारे मॅडम, नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरुर (स्टे.) विरूर चे संस्थापक सचिव रमेशजी पायपरे सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.



