ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्युत करंट लागून महिलेचा मृत्यू

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका महिलेचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला (दि.१७ ) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.सुफल सुनील वनकर, (वय २९) रा.पोंभूर्णा असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मृतक महिला घराच्या समोरील लोखंडी शेडमध्ये भांडी घासत होती.विद्युत पुरवठा करणारे वायर कटून असल्याने लोखंडी शेडमध्ये विद्युत करंट होते.याबाबत कोणतीही माहिती नसल्याने महिलेचा स्पर्श लोखंडी शेडला झाला यात तिला विद्युत करंटचा तीव्र झटका लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.घरी कुणीच नसल्याने घटनेची तात्काळ माहिती मिळाली नाही.दरम्यान आरडीचे पैसे घेणारा एजंट आल्याने घटनेची माहिती मिळताच स्थानिक वार्डवासीय तातडीने धाव घेतले.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृतक महिलेच्या पश्च्यात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे आंबेडकर चौक परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये