ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१९ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पोंभूर्णा शहरातील रामनगर येथील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- शहरातील रामनगर परिसरातील एका १९ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.भारत प्रमोद गुरनुले (वय १९) रा. पोंभूर्णा असे मृत तरुणाचे नाव आहे.

माहितीनुसार भारत गुरनुले याने सोमवारी शिवरात्री निमित्त मार्कंड्याच्या जत्रेला जाण्यासाठी वडिलाकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे नंतर देतो असे सांगितल्याने तो रागाच्या भरात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.दरम्यान लुंबिनी बुद्ध विहाराच्या पटांगणातील विहिरीजवळ त्याच्या चप्पला आढळून आल्या. यामुळे संशय बळावल्याने कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढले व पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे रामनगर व शहरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा आप्त परिवार आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये