ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरद विनायक स्पोर्टिंग क्लब गवराळा तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

रात्र कालीन शॉर्ट सर्किट टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       श्री. रामनवमी उत्सव समिती गणपती वॉर्ड गवराळा तर्फे संचालित वरद विनायक स्पोर्टिंग क्लब तर्फे दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ पासून रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

प्रत्येक सामना सहा षटका चा असेल याकरिता प्रवेश फी ११०० रुपये ठेवण्यात आलेली असून नियमाप्रमाणे १० खेळाडू एका संघात असतील . याकरिता अधिकाधिक संघानी सहभागी व्हावे असे आवाहन क्लब चे अध्यक्ष रोशन बदखल, अमर सावनकर सचिव रितेश बुच्चे, अतुल खारकर व क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता होऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी पर्यंत राहील.

सदर स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची लयलूट असणार असून प्रथम येणाऱ्या संघास वणी – आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तर्फे रोख २१००० हजार रुपये, द्वितीय संघास नगराध्यक्ष प्रफुल चटकी व नगरसेविका कविता सावनकर यांच्या तर्फे १६००० हजार रुपये रोख, तृतीय बक्षीस विजय डुकरे व विनोद सातपुते यांचे संयुक्त पने १०,००० हजार रुपये दिल्या जातील. मॅन ऑफ द सिरीज खेळाडूस नगरसेवक प्रथम गेडाम तर्फे १००१ तर

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूस गजानन कन्स्ट्रक्शन, मनीष बुच्चे, तसेच स्व. राहुल कुंभारे स्मृती प्रित्यर्थ अमित कुंभारे, स्व. बाळकृष्ण झाडे स्मृती प्रित्यर्थ प्रशांत झाडे यांचे तर्फे तसेच विक्रांत बिसेन, गोल्डन बार तर्फे अनुक्रमे १००१ रुपये रोख रक्कम देण्यात येईल.

स्वराज नगर जवळील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात आयोजित स्पर्धेत अधिकाधिक संघानी सहभागी व्हावे असे आवाहन क्लब चे उपाध्यक्ष अर्पित कुमरे, प्रतीक वरखडे, सहसचिव हरी डांगे, शैलेश आसुटकर, कोशाध्यक्ष उज्वल बुच्चे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये