ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

मेंडकी येथील शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील मौजा मेंडकी येथील रहिवाशी भास्कर गजभिये हा इसम मेंडकी लागत असलेल्या जावराबोडी मेंढा या जंगलागत असलेल्या शेत शिवारात सिंदी आणण्यासाठी गेला असता.,

वनपरिक्षेत्र उत्तर ब्रम्हपुरी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र मेंडकी येथील जंगला लगत गट क्रमांक 30 दिनांक 09.11.2025 ला भाष्कर गोविंदा गजभिये रा. मेंडकी वय वर्षे 55 हे सिदी तोडण्याकरीता गेले असता त्यांचेवर दुपारी 04.00 च्या सुमारास झुडुपात दबा धरून बसलेल्या बाघाने हल्ला करुन ठार केले. सदची घटना प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी नरड साहेब व अधिनिस्त कर्मचारी यांनी मौका स्थळी जाऊन चौकशी केली असता सदरची घटना वाघाचे हल्ल्यात झाल्याचे आढळून आले.

मौका स्थळी पंचनामा नोंद करुन शव उत्तरणीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आणण्यात आले, मौका स्थळी 5 कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आलेला आहे तसेच मानव व वन्यजीव संघर्ष उदभवू नये याकरीता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या डयूटया लावण्यात आलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये