ऑपरेशन मुस्कान : तब्बल तेरा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेलेल्या आरोपीस अत्यंत शिताफीने घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विवरण याप्रमाणे आहे की यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन खरांगणा येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 16 वर्षे हिला गुन्ह्यातील आरोपी किशोर नंदु जाधव रा.गारपिट ता.कारंजा याने फूस लावुन पळवून नेले. अशा दि 12/06/2013 ला फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे. खरांगणा येथे अप क्र. 56/2013 कलम 363,366 (अ)भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पीडित मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने गुन्हयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हयात अ फायनल क्रमांक 12/2015 दि.31/12/2015 प्रमाणे मंजुर करुन गुन्ह्याचा तपास कायम तपासावर ठेवला. सदर गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष वर्धा यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी व पिडीत मुलगी हे नारायणगाव जि. पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली असताना मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीची व पिडित मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता आरोपी नामे किशोर नंदु जाधव वय 39 वर्षे रा. गारपीट ता.कारंजा व गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नारायणगाव ,जि.पुणे येथे दोघेही राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून नमूद आरोपीस सौरभ कोल्हे रा. नारायणगाव जि. पुणे यांचे जय भोले ब्रिक्स येथुन ताब्यात घेऊन आरोपी त्याला अल्पवयीन पिडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहत असल्याचे सांगितले त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो. स्टे. खरांगणा करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. अल्का कुंभलवार, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा अमित शुक्ला सायबर पोलीस स्टेशन तसेच सायबर सेल येथील अक्षय राऊत, गोविंद मुंडे,यांनी केली.



