ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महा-ई-सेवा केंद्र चालकांचा संपाचा इशारा

१२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ३ दिवस केंद्रे राहणार बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात ब्रम्हपुरी तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र तसेच आधार सेवा केंद्र चालकांनी तीन दिवसांच्या संपाचा इशारा दिला आहे. या काळात १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सर्व केंद्रे बंद राहणार आहेत. या निर्णयाबाबत अखिल स्तरीय महा-ई-सेवा व आधार सेवा केंद्र संघटनेतर्फेमा. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आले. ब्रम्हपुरी तालुक्यात नागरिकांना ऑनलाइन शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी ही सेवा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. डिजिटल माध्यमातून नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च याची बचत होत असून, हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तरीही शासनाकडून या केंद्र चालकांप्रती सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप निवेदनातून केला. वारंवार बदलणारी परिपत्रके आणि नव्या “आपले सरकार सेवा केंद्र” संदर्भातील संभ्रमामले केंद्र चालक त्रस्तझाले असल्याचे नमूद करण्यात आले. शासन निर्णयातील विसंगती दूर करून परिपत्रकात फेरबदल करावेत, नवीन केंद्रांना मनमानी परवानग्या देऊ नयेत, तसेच आधार सेवा केंद्रांचे प्रलंबित कमिशन त्वरित द्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पवन जयस्वाल ब्रम्हपुरी, उपाध्यक्ष पराग राऊत, सचिव केशव पाटील तालुका सेतू संचालक ई.आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये