ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक

25 म्हैस जातीचे नर (रेडे) यांना दिले जिवदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 07/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखे चे पथक अवैध धंद्यावर कारवाई करणे करता पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडून खात्रीशीर खबर मिळाली की नागपूर ते हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक 44 मार्गावर टाटा कंपनीचा कंटेनर मध्ये म्हैस जातीचे नर (रेडे) कोंबुन त्यांची चाऱ्यापाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने भरून कत्तलीकरिता अवैधरित्या वाहतुक करून घेऊन जात आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाने सापळा रचून कलोडे चौक हिंगणघाट येथे नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या माहितीप्रमाणे काही वेळाने जाम ते हिंगणघाट नॅशनल हायवे क्रमांक 44 मार्गावर टाटा कंपनीचा कंटेनर भरधाव वेगाने येताना दिसताच सदर कंटेनर मोठ्या शिताफिने थांबवून पंचासमक्ष टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक आर.जे. 10 जीबी 7789 ची पाहणी केली असता सदर कंटेनरमध्ये 25 म्हैस जातीचे नर (रेडे) अवैध्यरीत्या कोंबुन त्यांची कोणतीही चाऱ्यापाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने व निर्दयतेने भरून कत्तलीकरिता अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना आरोपी नामे 1) मस्तकिम इलियास खान, वय 25 वर्षे, रा. ग्राम उदरी पोस्ट जिंजाना त. किराणा, जि. शामली उत्तर प्रदेश, 2) अरमान इस्राइल खान, वय 19 वर्ष, ग्राम दिंडुखेडा पोस्ट गेंगेरू त. किराणा जि. शामली उत्तर प्रदेश, 3) शादाब इरफान कुरेशी वय 40 वर्ष रा. ग्राम तावली पोस्ट शहापूर त. जि. मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश, 4) मुजफ्फर जफर पठाण, वय 52वर्ष, ग्राम बूटराडा पोस्ट दाखाना त. बनथ जि. शामली उत्तर प्रदेश, 5) आदिल जफर पठाण, वय 58 वर्ष, रा. ग्राम बूटराडा पोस्ट दाखाना त. बनथ जि. शामली उत्तर प्रदेश हे मिळून आल्याने पाच ही आरोपीतां ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 25 म्हैस जातीचे नर (रेडे) व एक टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक आर.जे. 10 जीबी 7789 असा *एकूण जु. किं. 50,00,000/- रु* चा मुद्देमाल मौकाजप्त पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पाचही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्र. 1552/2025 कलम 11 (1) (क)(घ)(ड)(च)(ज)(झ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, सहकलम 281 भारतीय न्याय संहिता, सहकलम 130/177, मोटर वाहन अधिनियम 1988 गुन्हा नोंद करण्यात आला. सदर जनावराना सुरक्षितते करीता व चारा पाण्याची व्यवस्था करीता 25 म्हैस जातीचे नर (रेडे) यांची वैद्यकीय तपासणी करून सर्व जनावरांना “औदुंबर गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट रुई खैरी त. जिल्हा नागपूर गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट हे करीत आहे.
*सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. राहुल इटेकर, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. अमर लाखे, पो.हवा. अमरदीप पाटील, पो.हवा. धर्मेंद्र अकाली. पो.हवा. प्रमोद पिसे, पो.हवा. महादेव सानप, पो.अ.विनोद कापसे, पो.अ अरविंद इंगोले, पो.अ. रितेश कु-हाडकर , पो.अ. सुमेध शेंदरे, पो.अ. राहुल अदवाल, म.पो.अ. स्मिता महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये