ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा पोलीस स्टेशनला प्रथमच महिला ठाणेदार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्यांनी ठाण्याची धुरा हाती घेतली असून लता सी. वाडीये यांनी नुकताच कोरपणा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदाचा पदभार स्वीकारला आहे.

पदभार स्वीकारताच ठाणेदार लता वाडीये यांनी नागरिकांशी संवाद साधत कायदा-सुव्यवस्थेचे पालन, महिला सुरक्षा, तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण हे आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, “पोलीस दलातील प्रत्येक सदस्याने प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच शांतता व सुव्यवस्था टिकवता येते.”

या नियुक्तीबद्दल स्थानिक नागरिक व महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “महिलांना नेतृत्वाच्या संधी मिळाल्याने समाजात नवे आदर्श निर्माण होत आहेत,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

महिला ठाणेदार लता वाडीये यांच्या नेतृत्वाखाली कोरपना पोलीस स्टेशनकडून महिला अत्याचार, गुन्हेगारी आणि सामाजिक समस्यांवर अधिक प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच कोरपणा पोलीस स्टेशनचे कारभार स्वीकारतात अवैद्य जनावराचा वाहन पास करणाऱ्या तोडीचा पडदा पास करण्यात आला यामुळे अवैध धंदे करणारे यांचे धागे धनकले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये