समर्थ कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल इंगळे निबंध स्पर्धेत प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन परिवर्तन – अमली पदार्थ विरोधी अभियान” या उपक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थिनी कोमल इंगळे हिने शालेय गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. समाजातील युवकांमध्ये अमली पदार्थांच्या वापराविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या स्पर्धेत उत्तम विचारमंथन, सर्जनशीलता व सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणाऱ्या कोमल इंगळे हिला प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभात पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे (बुलढाणा) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे, तसेच प्रा. चगदळे, प्रा. अरुण शेळके, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. पाटील आणि इतर सर्व प्राध्यापकांनी कोमलचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयामार्फत सांगण्यात आले की, “कोमलचे यश हे समर्थ परिवारासाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे.



