ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ध्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा धडाका!

PSI विशाल सवाई यांच्या पथकाची मोठी कामगिरी – ₹7.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरात पुन्हा एकदा PSI विशाल सवाई यांच्या पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.

परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई हे त्यांच्या पथकासह शहर परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार (MH 32 Y 2541) ही देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करत आहे.

या माहितीवर तात्काळ सिद्धार्थनगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली. थोड्याच वेळात ती कार दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी मोकळ्या रस्त्याने पळवली. पोलिसांनी पाठलाग करत अखेर ती कार लक्ष्मीनगर आलोडी परिसरात उभी अवस्थेत मिळवली, मात्र आरोपी पसार झाला.

पंचासमक्ष कारची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपनींच्या विदेशी दारू व बिअरच्या 25 पेट्या (किंमत ₹2,40,000) टॅंगो पंच कंपनीच्या 90 एमएलच्या 15 निपा (किंमत ₹1,500) असा एकूण ₹2,41,500 रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. त्यासोबतच ₹5,40,000 किंमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट VDI कार देखील जप्त करण्यात आली.

एकूण जुमला ₹7,81,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

सदर आरोपीविरुद्ध मद्य निषेध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक संतोष ताले आणि प्रभारी निरीक्षक अजय भुसारी यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवाई आणि त्यांचे पथक शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, अक्षय सावळकर, वैभव जाधव, श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे व अभिषेक मते यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये