पोलीस स्टेशन वर्धा शहर डी. बी.पथकाची कारवाही
आरोपी कडून अँड्रॉइड मोबाईल व नगद रुपये जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दाखल अपराध क्र. 1613/25 कलम 303(2) BNS मधील अज्ञात चोरट्याने घरातं शिरून पलंगावर ठेवलेला मोबाईल व भिसीचे दहा हजार रुपये चोरुन नेला. ही घटना मांगपुरा, शिवाजी चौक वर्धा येथे घडली. फिर्यादी नामे मंगला सुनील बावने हिच्या घरी एक अज्ञात व्यक्ती गेला. तो सांधे दुखीचे औषधी विकत असल्याने त्याला घरात बोलावले. मात्र फिर्यादी काही कामानिमित्त आत गेली असता संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने पलंगावर ठेवलेला विवो कंपणीचा मोबाइल व 10,000/- रोकड घेऊन फरार झाला.सदर अज्ञात आरोपी चा कसोशीने शोध घेऊन आरोपी नामें मनोहर कन्हैया बेनपे रा. हेटी (सावध)ता. आर्वी जि. वर्धा याची कसून चौकशी केली असता त्याने चोरलेला विवो कंपनीचा मोबाईल किंमत 7,000/- रुपये व नगद 7000/- रुपये असा एकूण जुमला किंमत 14,000 रुपये चा माल जप्त करून सदरचा गुन्हा उघड करण्यात आला.
सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक संतोष ताले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड सर, गुन्हे प्रगटीकरण पथका चे पोलीस हवालदार विजय पंचटिके, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार नितीन इटकरे,पोलीस हवालदार गजेंद्र धर्मे, पोलीस अंमलदार रंजित भुरसे सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे.



