समर्थ कृषी महाविद्यालयात “वंदे मातरम्” गीताचा १५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, दे. राजा येथे वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम व सामूहिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी सर्वांनी एकजुटीने “वंदे मातरम्” हे गीत सादर करत भारतमातेप्रती आपले प्रेम,अभिमान आणि निष्ठा व्यक्त केली.वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये निबंध स्पर्धा ,लोगो डिझाईन, कविता लेखन,आणि रील मेकिंग अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमासाठी समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग यांनी दीनदयाल हायस्कूल, देऊळगाव राजा येथे सुद्धा या सामूहिक गीत गायनामध्ये मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग दिला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणे आणि मातृभूमीबद्दल आदर, अभिमान जागवणे हे होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना या गीताचा इतिहास, त्यामागील राष्ट्रभक्तीपूर्ण विचार आणि स्वातंत्र्य चळवळीत याचे योगदान याची माहिती देण्यात आली.संपूर्ण वातावरण “वंदे मातरम्”च्या सुरांनी भारावून गेले होते.
हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. वाय. एस. चगदळे, रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी प्रा.ए. व्ही.जाधव तसेच प्रा.डी.पाटील, प्रा.ए.शेळके, प्रा.कवर, प्रा.व्ही.एस.पवार , प्रा. एस.सोळंकी,प्रा.घुगे व अंतरकर,शेख,सय्यद,काळुशे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



