भाविकांची तहान भागवली — स्पंज आर्यन कामगार संघटनेतर्फे शरबत वाटप
वढा यात्रेत सेवाभावी उपक्रम; कामगार नेते दिनेश दादापाटील चोखारे यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त वढा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पारंपरिक यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची तहान भागवण्यासाठी ताडाळी एम. आय. डी. सी. स्पंज आर्यन कामगार संघटनेतर्फे शरबत वाटप उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना शरबत वाटून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेवा भाव जपला.
या उपक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच ताडाळी एम. आय. डी. सी. स्पंज आर्यन कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते दिनेश दादापाटील चोखारे यांच्यासह ओबीसी नेते सचिन राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, आणि संघटनेचे महासचिव संतोष बांदूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष तुळशीराम डेरकर, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, कोषाध्यक्ष सदाशिव चतुर, तसेच दशरथ रोगे, रमेश आरपेल्ली, विकास आवारी, सागर कन्नीरवार, संतोष खोब्रागडे, विजय मोरे, महेश जुनघरे, नंदू टोंगे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



