ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पक्षी सप्ताह दरम्यान पक्ष्यांची शिकार

सावली वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली : वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा उमरी लगतचे उमरी तलावात वन्यजीव सप्ताहानिमित्य स्थानिक वनकर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असतानाचे दरम्यान रेशाळ कंठाची भिंगरी (Streak threated swallow) या पक्षाची शिकार करताना गडचिरोली जिल्हयातील 4 आरोपीस मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात मिळाले यश

सविस्तर माहीती याप्रामाणे की, दरवर्षी पक्षीतज्ञ प‌द्मश्री स्व. मारोती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दिनांक 05 ऑक्टोबर ते जेष्ठ पक्षीतज्ञ स्व. डॉ सलीम अली यांचा जन्मदिवस 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह वनविभागातर्फे साजरा केल्या जातो. या सप्ताहादरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत, कोणते पक्षी बाहेर देशातून, राज्यातून आलेत, त्यांचे जीवनकम व त्यांची ओळख पटवून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो.

दि. 07.11.2025 रोजी पहाटेच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा उमरी जगतचे उमरी तलावात वन्यजीव संप्ताह साजरा करीत असतानाचे दरम्यान गडचिरोली जिल्हयातील 4 शिकारी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूची-II, भाग-2 मधील अनुक्रमांक 1001 वर समाविष्ठ असलेली रेशाळ कंठाची भिंगरी (Streak threated swallow) या पक्षाची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळ गाठून 1. लोमेश धोंडू गेडाम, वय-34 वर्षे, 2) प्रताप बालाजी जराते, वय-45 वर्षे, ३) अरविंद धोंडू गेडाम, वय-33 वर्षे, 4) मुखरू सखाराम मेश्राम, वय 65 वर्षे, सर्व रा. पो. पारडी, ता. जि. गडचिरोली यांना शिकार करताना जाळी -08 नग, थैली-05 नग, 09 नॉयलॉन दोरी -09 बंडल, बांबू काठ्या 16 नग, लाकडी खुंटी-08 नग, शिकारीतील मृत पक्षी 225 नग, मोटार सायकल (CB Shine MH-33/X0113 & Bajaj Discover MH-33/L-3165) 02 नग या शिकारीतील मुद्देमालासह पकडण्यात आले. वरील चारही आरोपींविरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम – 1972 चे कलम 9, 39, 49, 50, 51 अन्वये वनगुन्हा क. 204/232851/2025 दि. 07.11.2025 नुसार वनगुन्हा नोंदविला असून सदरची कार्यवाही श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली श्री अनंत राखुंडे वनक्षेत्र सहायक, व्याहाड, श्री महादेव मुंडे वनरक्षक सिर्सी भोलेश्वर सोनेकर वनरक्षक सामदा, श्री एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी व आर. एस. डांगे वनरक्षक उपरी यांचेसह स्थानिक पीआरटी चमू व बिट मदतनीस यांनी केली.

पुढील तपास श्री राजन तलमले विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर व श्री विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये