शिवसेना उबाठा तर्फे भद्रावती येथे २ नोव्हेंबरला आढावा बैठकीचे आयोजन
लोकसभा संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या संदर्भात लवकरच आचारसंहिता जाहीर होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत प्राप्त होत आहे.त्यासंदर्भात आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेची मशाल प्रज्वलित करण्यासाठी, शहर व तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी, निवडणुका जिंकण्याकरिता रणनिती ठरविणे, शिवसेनेच्या परंपरागत मतदारांना शिवसेनेच्या प्रवाहात आणणे आदी चे नियोजन करण्यासंदर्भात २ नोव्हेंबर रोज रविवारला बालाजी सभागृह भोजवार्ड भद्रावती येथे सकाळी ११.००वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर आढावा बैठकीला आमदार तथा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख श्री संजय भाऊ देरकर यांच्या प्रमुख उपस्थिती सह शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख श्री भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात हि आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
तरी शिवसेना उबाठा च्यासर्व आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवा सेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, तसेच पक्षाशी संलग्नित सर्व विंगचे आजी माजी पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल तथा शिवसेना शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांनी केले आहे.
 
					 
					 
					 
					 
					


