चंदनखेडा येथील युवा देवानंद, स्वप्निल, नागेश्वर, शंकर व सालोरीचा अतुल नन्नावरे ठरले प्रेरणादायी रक्तदाते
डेंग्यू रुग्णांस मोलाचे योगदान : समाजसेवा आदर्श

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून चंदनखेडा येथील देवानंद दोडके व स्वप्निल दडमल, नागेश्वर चौधरी,शंकर दडमल व सालोरी येथील अतुल नन्नावरे या तरुणांनी रक्तदान करून समाजातील युवकांसामोर एक सशक्त आणि प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. केवळ भाषणामध्ये नव्हे तर कृतीतून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ‘रक्तदान म्हणजेच जिवनदान ‘हे तत्व सिद्ध केले.
आशिष हनवते (रक्तदाता) चंदनखेडा यांच्या एका फोन व चारही तरुणांनी जश्या अवस्थेत आहे त्याच परिस्थितीत सोबत येवून कस्तुरबा हाॅस्पिटल सेवाग्राम येथील ब्लड बँक मधी रक्तदान करून डेंग्यू रुग्णांस मोलाचे योगदान केले.
हे चारही युवा केवळ शिबिरापुरते मर्यादित राहत नाहीत.तर गरज पडल्यास तात्काळ हाॅस्पिटल मध्ये जाऊनही रक्तदानासाठी तत्पर असतात.त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले असुन . त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे संपूर्ण चंदनखेडा परिसरातुन कौतुक केले जात आहे.
आशिष हनवते यांच्या प्रेरणेने अनेक मित्रांनीही नियमित रक्तदान सुरु केले आहे.सामाजिक कार्याची ही साखळी अधिक बळकट व्हावी यासाठी ते सातत्याने युवकांमध्ये जनजागृती करत असतात.आशिष हनवते यांचे कार्य हे केवळ समाजासाठीच नव्हे तर तरुणांसाठीही एक प्रेरणास्थान आहे.अशा व्यक्तिमुळेच समाजात सेवा, स्नेह आणि समर्पणाची भावना वाढीस लागते.
 
					 
					 
					 
					 
					


