कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
विठ्ठल मंदिर देवस्थान समिती भद्रावतीचे वतीने कार्तिकी एकादशी निमित्त दिनांक २ व ३ नोव्हेंबर २०२५ ला विठ्ठल मंदिर देवस्थान भद्रावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ७.०० वाजता विठ्ठल रखुमाई मूर्तीची महापूजा व अभिषेक कार्यक्रम होईल त्यानंतर सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत भजन संमेलन होणार आहे या भजन संमेलनामध्ये प्रत्येक भजन मंडळास सादरीकरणासाठी १५ मिनिटामध्ये भजन सादर करायचे आहे तसेच सहभागी भजन मंडळांना मानधन देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोज सोमवारला सकाळी ११.३० वाजता ह.भ.प.नथुजी रासेकर महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल व दुपारी १२.०० वाजता ह.भ.प. पांडुरंगजी ताजने गुरुजी, जनजागृती कीर्तन व प्रवचनकार सत्संग मंडळ यांच्या हस्ते गोपालकाला व कीर्तनाचा कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक चंद्रकांतजी गुंडावार व विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे वतीने करण्यात आले आहे.
 
					 
					 
					 
					 
					


