भद्रावतीत युवासेना व शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट
तरुणाईच्या सहभागाने संघटना अधिक बळकट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यात शिवसेना आणि युवासेनेत नवचैतन्य संचारले आहे. तरुणाईचा वाढता सहभाग, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेप्रती निष्ठा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने भद्रावतीत पक्षप्रवेशाची लाट उसळली आहे. शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भद्रावती येथे नुकताच भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, असंख्य युवकांनी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,सचिव किरण साळी मुख्य सचिव राहुल लोंढे, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना लोकसभा समन्वयक महेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात युवासेना तथा शिवसेनेत प्रवेश करून संघटनेत नवसंजीवनी ओतली.
या कार्यक्रमाला माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, शहरप्रमुख पप्पू सारवण, महिला आघाडी शहरप्रमुख तृप्ती हिरादेवे यांच्यासह माजी नगरसेवक प्रमोद गेडाम, चंद्रकांत खारकर, संदीप वडाळकर, माजी नगरसेविका शोभा पारखी, अनिता मुळे, जयश्री दातारकर, रेखा खुटेमाटे, शीतल गेडाम, सुनीता टिकले, आशा निंबाळकर, प्रतिभा सोनटक्के, लक्ष्मी पारखी, उपशहर प्रमुख आकाश वानखेडे,कमलेश दातारकर, मंगेश ढेंगळे, युवासेनेचे नकुल शिंदे, लोकसभा सचिव सूरज शहा, जिल्हा सचिव पीयुष सिंग, जिल्हा संघटक सुमित हस्तक, माजी शहर प्रमुख सोनू बोनागिरी व विधानसभा अध्यक्ष मुनेश्वर बदकल यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.
या मोठ्या प्रमाणावरील पक्षप्रवेशामुळे भद्रावती तालुक्यात शिवसेना व युवासेनेत संघटनात्मक पकड आणखी मजबूत झाली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना आत्मविश्वासाने आणि सशक्त संघटनेच्या बळावर मैदानात उतरणार असल्याचा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी मुकेश जिवतोडे म्हणाले, “शिवसेना म्हणजे जनतेचा आवाज आणि युवासेना म्हणजे त्या आवाजाला उर्जा देणारी शक्ती. तरुणाई मोठ्या संख्येने शिवसेनेच्या विचारधारेशी जोडली जात आहे, हीच आमच्या संघटनेची खरी ताकद आहे.



