देऊळगाव राजा येथे 31 ऑक्टोंबर रोजी “वॉक फॉर युनिटी” उपक्रम
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त भव्य आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतरत्न लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7 वाजता ‘वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम उपस्थित राहणार आहेत, रन वॉक ची सुरुवात शिवाजी हायस्कुल पासून होणार आहे शहरातील बस स्थानक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शहीद जवान चौक, कुंभारी बाय पास व परत शिवाजी हायस्कुल मध्ये विसर्जित होईल,या कार्यक्रमात नागरिक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, विविध सामाजिक संस्था आणि शासकीय अधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्राह्मगिरी यांनी केले.
“देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या या वॉक फॉर युनिटी उपक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या कार्यातून आपल्याला एकतेचा व राष्ट्रीय ऐक्याचा प्रेरणादायी संदेश मिळतो.”
नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक दिवशी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्राह्मगिरी यांनी केले आहे.



