ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ज्येष्ठ नागरिकांचे हयात प्रमाणपत्र मोफत काढा
ग्राहक पंचायतीचे बँकांमध्ये निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सेवानिवृत्त असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी बँकेमध्ये हयात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. प्रत्येक नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र बँकेत सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र बँकांकडून मोफत काढण्यात यावे व त्यासाठी बँकेत स्वतंत्र काउंटर निर्माण करण्यात यावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे शहरातील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँकेत सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदन सादर करताना ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बालाजी दांडेकर, सचिव बाळा कुटेमाटे, कोषाध्यक्ष गोपाल घुमे, मार्गदर्शक शेखर घुमे, जिल्हा मार्गदर्शक पुरुषोत्तम मते आदी उपस्थित होते.



