ब्रम्हपूरी तालुक्यात आ.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चांदा ब्लास्ट
सत्तेत असो वा विरोधी बाकावर, विकासकामात कुठलीही तडजोड न करता मतदारसंघाच्या विकासासंदर्भात सदैव कटिबध्द असणारे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी विकासाचा झंझावात कायम राखत ब्रम्हपूरी तालुक्याच्या विकासासाठी शासनस्तरावर अथक प्रयत्न करीत कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणला. याच विकास निधी अंतर्गत ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध गावांमध्ये आज विकासकामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
आयोजित विकासकामात मालडोंगरी येथे मालडोंगरी येथील आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन (२० लक्ष रू.), चौगान येथे अभ्यासिका बांधकाम भुमीपुजन (४५ लक्ष रू.), खडीकरण रस्ता बांधकाम भुमीपुजन (१० लक्ष रू.), जुगनाळा अभ्यासिका बांधकाम भुमीपुजन (१५ लक्ष रू.), किन्ही येथे बौद्ध समाज मंदिर लोकार्पण (१५ लक्ष रू.), भोई समाज मंदिर बांधकाम भुमीपुजन(१५ लक्ष रु.), रणमोचन येथे समाज मंदिर बांधकाम भुमीपुजन (१५ लक्ष रू.), निलज येथे समाज मंदिर बांधकाम भुमीपुजन (१५ लक्ष रू.), रूई सिमेंट रस्ता बांधकाम भुमीपुजन (८ लक्ष रू.), तुलानमाल येथे मानका देवी समाज मंदिर लोकार्पण (१५ लक्ष रू.), गायडोंगरी येथे समाज मंदिर बांधकाम भुमीपुजन (१५ लक्ष रू.), रानबोथली येथे समाज मंदिर लोकार्पण (१५ लक्ष रू.), सावरदंड चक ते मुख्य रस्त्यापर्यंत खडीकरणाच्या बांधकामांचे भुमीपुजन (३० लक्ष रू.), चकबोथली येथे बौद्ध समाज मंदिर बांधकाम भुमीपुजन (१५ लक्ष रू.) या कामांचा समावेश आहे.
आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधतांना विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सर्वांनी जी सेवेची संधी दिली त्या संधीनेच जनसेवेसाठी तसेच क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आपणशी जुळलेली नाळ व अतूट असे विश्वसनीय नाते या ऋणानुबंधाला मी कदापीही तडा जाऊ देणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ.थानेश्वर कायरकर, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सरपंच उमेश धोटे, कृउबा संचालक किशोर राऊत, अनुसूचित जाती सेलचे सरचिटणीस डि.के.मेश्राम, अण्णाजी ठाकरे, माजी संचालिका सुचित्रा ठाकरे, गणेश घोरमोडे, कृउबा संचालक दिवाकर मातेरे, देवचंद ठाकरे, सरपंच मंजुषा ठाकरे, उपसरपंच घोरमोडे, श्रीहरी देवगडे, चंद्रशेखर मेश्राम, पुंडलिक प्रधान, हेमंत ठाकरे, अशोक भुते, शंकर कोपुलवार, जगदीश नाकतोडे, प्रमोद भर्रे, विलास मेश्राम, संजय प्रधान, धीरुगोपाल धोंगडे, गोपाल ठाकरे, व मोठ्या संख्येने उपस्थित होते.



