महेश जिवतोडे यांची युवासेना चंद्रपूर लोकसभा समन्वयकपदी नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर झाली.
या घोषणेनुसार महेश जिवतोडे यांची युवासेना चंद्रपूर लोकसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीपत्रावरील मान्यता युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव (महाराष्ट्र राज्य) किरण साळी, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आली.
महेश जिवतोडे हे अनेक वर्षांपासून युवासेनेत सक्रिय राहून युवकांच्या प्रश्नांवर लढणारे, सामाजिक उपक्रमांचे अग्रणी आणि संघटनात्मक कार्यात सातत्याने योगदान देणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नियुक्तीमागे पक्ष नेतृत्वाचा पूर्ण विश्वास असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे चंद्रपूर लोकसभेतील युवासेनेचे संघटन अधिक सक्षम आणि जोमदार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.