सीएटीसी-६१८ शिबिर ओटीए कामठी, नागपूर येथे संपन्न
डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावतीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए), कामठी, नागपूर येथे आयोजित संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-618) यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावतीच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
ज्युनिअर अंडर ऑफिसर विक्रम नन्नावरे यांनी खेळात २ पदके आणि ड्रिलमध्ये १ पदक मिळवत उत्कृष्ट नेतृत्वाचे दर्शन घडविले.
सीएचएम स्वाती गायकवाड यांनी ड्रिलमध्ये १ पदक पटकावले.
एलसीपीएल विशाखा नितम हिनेही ड्रिलमध्ये १ पदक मिळवले.
सीक्यूएमएस करण राजहानीरे, एलसीपीएल हर्षल बावने, कॅडेट क्रांतिवीर चौधरी आणि एलसीपीएल श्रुती बशाशंकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शिबिरात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या शिबिरासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे विशेष मार्गदर्शन लाभले.प्राचार्य प्रमोद पाठक
प्रा. डॉ. प्रशांत पाठक, प्रा.विशाल दीपक प्रसाद, प्रा. नेहा मानकर, प्रा. कपिल राउत, प्रा. प्रज्ञा बुराडकर, प्रा. प्रीति कंदीकट्टीवार, सीमा हवेलीकर, पूनम काळे आणि नेहा सुर्टीकर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मानसिक तयारीसाठी प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे संस्थेतील शिस्त, नेतृत्वगुण आणि खेळाडू वृत्तीचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे.
महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की समर्पण आणि संघभावना यांनी कोणतीही उंची गाठता येते.