निधन वार्ता : ठाकुरदास मर्दाने यांचे निधन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
वरोरा : ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने यांचे मोठे बंधू ठाकुरदास गुरुचरणजी मर्दाने यांचे आज (बुधवारी) सकाळी ८.३५ वाजताच्या दरम्यान येथील उप जिल्हा रुग्णालयात कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून डॉक्टरांकडून त्यांच्यावर कसोशीने उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी ,दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंड, दोन भाऊ, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
व्होल्टास रेफ्रिजरेटर कंपनीतून त्यांना सेवानिवृत्ती मिळाली होती. अत्यंत प्रामाणिक, मनमिळाऊ व अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
ठाकुरदास मर्दाने यांचे पार्थिव गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९.२५ वाजेपर्यंत त्यांच्या रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा तिथूनच सकाळी ९.३० वाजता निघेल व १०.०० वाजता आनंदवनातील श्रध्दावन मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.