ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवंगत देवदास बन्सोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्कार सोहळा व कवीसंमेलन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवंगत देवदास राघोबा बन्सोड यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या निमित्ताने आयोजित कवीसंमेलनात निवडक गायक-कवींच्या सुरेल कवितांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कवी प्रदीप देशमुख, दिलीप पाटील, सुनील बावणे आणि गजानन माद्यसवार यांनी त्यांच्या काव्यगायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ तसेच ‘मिलिंद प्रश्न’ या ग्रंथांचे मागील तीन महिन्यांपासून वाचन करून त्यावर विवेचक चर्चा करणाऱ्या १५ महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कॅन्सर पेशंटसाठी कार्यरत ‘हेल्पिंग हँड टीम’ मधील अनेक कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आयु. प्रविण (बाळूभाऊ) खोबरागडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयु. तनुजा रायपुरे व दलित मित्र आयु. डी. के. आरीकर उपस्थित होते. संगीताच्या सुमधुर वातावरणात आयु. सुषमा वनकर, शमा उराडे, मृणाली देवगडे तसेच डॉ. एस. बी. किशोर यांनी अतिशय सुंदर गीत सादर केले. देविदास बनसोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ . विद्याधर बन्सोड यांनी केले होते. सदर कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्याला एकत्रित व्यासपीठ मिळाले, असे उपस्थितांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये