ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त शिक्षक शुद्धोधन कांबळे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक विद्यानगरीं येथील रहिवासी शुद्धोधन शिवराम कांबळे ,वय 61 वर्ष यांचे 9 मार्च रोजी रात्री 9.35 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले
10 मार्च रोजी मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर बिनबागेट चंद्रपूर येथील शांतीधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका तथा गडचांदूर च्या माजी नगराध्यक्षा विद्याताई कांबळे, मुलगा गौरव कांबळे, सुन, नातू यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे.



