क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर _ आशा ताई शेळके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेमुळेच स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आघाडी वर असून स्वावलंबी झालेल्या आहेत असे मत देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटने च्या संघटिका सौ आशाताई शेळके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थाना वरून बोलताना व्यक्त केले.
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव अहिरे, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, जेष्ठ नागरिक संघटना चे कार्याध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी, कैलाश शेळके होते.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. विजय रायमल, शांतीलाल निरफळे, रमेश नरोडे, प्रा. विनायक कुळकर्णी, प्रकाश खांडेभराड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला प्रा अशोक डोईफोडे, अरुण सपाटे, घनश्याम भंडारे, सुशील हनुमंते, तथा इतर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



