ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या दारूची वाहतूक एकूण 8 लाख 22 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सर्व देश, राज्य शहर हे अयोध्या येथील प्रभुरामाच्या प्रतिस्थापना प्रसंगी भक्तीच तल्लीन होणार आहे याप्रसंगी कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्रभारी यांना योग्य त्या सुचना देऊन सर्वाना दक्ष राहुन आपआपले परीसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांनी आपले उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील त्यांचे अधिनस्त असलेले पथकास योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन दारुबंदी संबंधी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार दिनांक 22.01.2024 रोजी मध्यरात्रीचे सुमारास उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक हे वर्धा शहर परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनिय माहीती वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी यातील आरोपीतांनवर समता नगर, वरूड सेवाग्राम जि. वर्धा येथे नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे 1) सुधीर चंद्रभाग सहारे वय 54 वर्ष रा. वार्ड न. 4 समता नगर, वरूड सेवाग्राम जि. वर्धा 2) मयुर प्रकाश मंद्रीले वय 24 वर्ष रा. स्नेहल नगर, सेवाग्राम रोड, वर्धा 3) प्रफुल शंकरराव बांगळकर वय 30 वर्षे रा. सावजी नगर, झोपडपटटी, वर्षा असे मिळुन आले त्यांचे ताब्यातुन मि 1) जुनी वापरती एक चारचाकी हुंडाई कंपनीची सोनाटा क्र एम.एच. 02 जे.पी. 6921 गोल्डन सिल्वर रंगाची किंमत अंदाजे 7,00,000/- रू त्या मध्ये रॉयल स्टैंग कंपनिच्या, ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, टुबर्ग बियर कपंनीच्या दारूच्या अश्या वेग -वेगळया कपंनीच्या विदेशी दारूच्या 8 पेटया की. की. 1,20,000 रू 2) दोन नोकीया कपंनीचा साधा किपेंड वाला मोबाईल की 2,000/- रू असा जु की 8,22,000/- चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली. सदरची विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता कंळब येथील हिरा कोहचडे रा. कळंब जि.यवतमाळ यांनी दिले असे सांगीतले.

पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे चारही आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक 35/2024 कलम कलम 65 अ ई. 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सेवाग्राम येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. व पो.नि. संजय गायकवाड, स्था.गु.शा वर्षा याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये