पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुंड व दारुविक्रेत्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतीत कुख्यात गुंड / दारुविक्रेता रविन्द्र तुकाराम डेकाटे, वय ४० वर्ष, राह. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाटचे अभिलेखावर सन २०१० पासुन शरीरा विरुध्द, तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण ४९ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, विनयभंग करणे, दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देणे, दारुची विक्री व बाहतुक करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद असून सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. सन २०१० पासुन स्थानबध्द इंसम नामे रविन्द्र तुकाराम डेकाटे याने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्य पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. रविन्द्र डेकाटे याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन २०१८ व सन २०२४ मध्ये कलम ५६(१) (अ), (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रत्येकी ३ महोन्यांकरीता वर्धा जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. तसेच सन २०२० मध्ये कलम १५१(१),१०७,११६(३) फौजदारी प्रकीया संहीता, व सन २०२२ मध्ये कलम ११० (ग) फौजदारी प्रकीया संहीता, अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु स्थानबध्द ईसम हा अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. देवेन्द्र ठाकुर पो.स्टे. हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे सार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २६ जुन २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मधी सी.. तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.
सन २०२४ मध्ये एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ११ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानयध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डो. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात स. फौ. संजय खल्लारकर, पो.हवा. अमोल आत्राम, पो. हया. आशिष महेशगोरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. देवेंद्र ठाकुर, पोलीस अंमलदार पो. हवा. प्रविण देशमुख, विजय हारनूर पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.