विदर्भ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- येथील विदर्भ महाविद्यालयात सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि बहुजन समाजासाठी समर्पित कार्य करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रा. गंगाधर लांडगे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घेणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शारदा शाक्य यांनी ही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की शाहू महाराजांचे कार्य आणि विचार आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे ठरतात.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. अमित बोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.