ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे संचालक तथा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. अनिलराव चिताडे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दर शनिवारला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर उपक्रम घेतल्या जात आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.
20 सप्टेंबर रोजी आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन प्रा. प्रदीप परसुटकर व प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले. उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, प्रा. नंदा भोयर, प्रा. प्रभाकर कोल्हे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.