ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सदस्य मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचीत्य साधत शहरातील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा सदस्य मेळावा शहरातील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट देविदास काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंध गणेश काळे, श्री भवरकर, सुनील पांडे, सचिन गौरखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठेवीदार व अभिकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सहकार क्षेत्राचे महत्त्व विशद केले,तसेच संस्था सदस्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे सांगितले.

प्रास्ताविकेतून संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी संस्थेच्या प्रगती बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन सचिन ढोके यांनी तर आभार सुरेश बरडे यांनी मानले. मेळाव्याला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी तथा अभीकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये