ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा चिखली रोडवरील आळंद शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार झाल्याची घटना 12 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली

सविस्तर वृत्त असे की, निलेश गणेश मुंढे वय 22 वर्ष रा रा. असोला जहांगीर हा मोटार सायकल बजाज प्लॅटीना क्रं एम एच28 बी व्ही 0341 वरुन देऊळगांवमही येथुन घरी असोला जहाँगीर येथे येत असतांना अज्ञात वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन निलेश मुढे यांचे मोटार सायकल ला कट मारल्याने तो सिमेंटरोडवर खाली पडुन त्याचे चह-यावर गंभीर दुखापत होवुन मृत्यू पावला

घटनेची माहिती पोलीस ठाण्यात सुभाष लक्ष्मण मुंढे यांनी दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकां विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये